पतपेढीची आर्थिक मजबुतीचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.
पतपेढी भाग धारकांना सतत १२% लाभांश देत होती पण २०१४-१५ या आर्थिक सालापासून वार्षिक सर्व साधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर १३% लाभांश देण्यात आम्ही यशस्वी राहिलो आहोत. श्री विश्वेश्वर पतपेढीने भागधारक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये स्नेह्भावाचे गोड नाते निर्माण केले आहे आणि या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतेक भाग धारकांनी आणि त्यांच्या नातलगांनी आपल्या ठेवी मुदत ठेवीत ठेऊन इतर संस्थेपेक्षा जास्त व्याजाचा लाभ उठविला आहे. या ठेवी जवळ जवळ २५ कोटीं ७० लाख घरात गेलेल्या आहेत.यावरूनच पतपेढीवरील भागधारकांचा विश्वास सिद्ध होतो हे वेगळे सांगावयास नको.
पतपेढीची हि अशी यशाची घौडदौड चालू असतानाही पतपेढी आपल्या सामजिक बांधिलकीची जाण ठेवून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. सभासद व सभासदांच्या मुलांसाठी गुणगौरव सोहळा, संचालक, कर्मचारी आणि सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. सभासद मृत्यूनंतर त्यांच्या वारसास सभासद कल्याण निधीतून मदत केली जात आहे.
पतपेढीच्या कार्याचा विचार केल्यास सध्या पतपेढी बचत ठेव,मुदत ठेव,आवर्त ठेव,आणि दैनंदिन ठेव आणि इतर आकर्षक ठेवीच्या योजना राबवित आहे. या सर्व योजना इतर अर्थ संस्थापेक्षा जास्त लाभदायक आहेत यात शंकाच नाही.सभासदांसाठी तातडीचे कर्ज,वैयक्तिक कर्ज,शैक्षणिक कर्ज,वाहन तारण कर्ज आणि व्यवसाय कर्ज दिले जात आहे. गृह बांधणी कर्ज(स्थावर तारण कर्ज) रु.५० लाखापर्यंत तसेच एक तासात सोने तारण कर्ज दिले जाते.या सर्व कर्जावर व्याजाचा दर इतर पतपेढयांच्या मानाने नक्कीच कमी आहे. अशी ही आमची श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी आमच्यासाठी नक्कीच कामधेनु आहे.
पतपेढीने भावी काळासाठी कार्यक्षेत्र संपूर्ण बृह्मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पर्यंत विस्तार करण्यासाठी शिफारस निबंधकाकडे केलेली आहे.
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.