या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ञांच्या मते पतपेढी मध्ये कार्यक्षम संचालक मंडळ असणे आवश्यक आहे, जेणे करून पतपेढीचे भागभांडवल,ठेवी व कर्ज वाटप यात प्रत्येक वर्षी कमीत कमी २० टक्क्यांनी तरी वाढ होत गेली पाहिजे.
संचालक मंडळ आपणांकडून खालील गोष्टीची अपेक्षा करीत आहोत.
- सर्व समाज संस्थांनी /मंडळानी श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीचे सक्रीय भागधारक व्हावे.
- सर्व समाज संस्थांनी /मंडळानी,निवृत्त व सक्षम व्यक्तींना आपल्या ठेवी श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीतच ठेवणे.
- गरजू व्यक्तींना तसेच धैर्यवान व्यावसायिकांनी त्यांना लागणारे गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीतून घेणे.
- कार्यक्षम म्हणजेच धनको व ऋणको ऐपत असणाऱ्या भागधारकांनी संचालक पदावर येण्यासाठी प्रयत्न करणे.
संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आम्ही सर्व संचालकांनी संस्थेची आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही २०१० साली कार्यभार स्विकारला त्यावेळी संस्थेची आर्थिक उलाढाल हि ६ कोटी ७ लाख होती ती आम्ही डिसेंबर २०१७ पर्यंत ३५ कोटी ८२ लाख पर्यंत वाढविण्यात यश मिळाले आहे. सर्व सभासद, भागधारक, ठेवीदार, कर्जदार या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आपण शक्य झाले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व संचालक व कर्मचारी वर्ग सर्वांचे आभारी आहोत.
पण केवळ इथेच न थांबता, श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीने येणाऱ्या कालखंडात मुंबई विभागात १० शाखांचे जाळे व ७५ कोटी हून अधिक ठेवी उभारणे हे आव्हान स्विकारले आहे.ते पूर्ण करण्यास सर्व सभासद बंधू भगिनिंचे व त्यांच्या स्नेहीजनांचे सहकार्य लाभल्यास नक्कीच १०० हून अधिक कोटीच्या उलाढालीचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल. तसेच ठाणे,पालघर,नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हांचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचे ध्येय दृष्टीशेपात आहे. या कामी आपले सहकार्य मोलाचे आहे. कार्यक्षेत्र विस्ताराचे निकष शासनाने अतिशय कठीण केले आहेत तरी सुद्धा आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते निकष पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पर्यंत विस्तार करण्याचा भविष्यात निश्चित प्रयत्न केला जाईल. आपला पाठींबा आतापर्यंत लाभला तसा भविष्यात लाभल्यास निश्चितच हे कार्य सिद्धीस नेण्यास आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे अभिवचन देतो. सभासदांच्या जीवनात नव चैतन्य घेवून येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
श्री.दिलीप दशरथ केळंबेकर
अध्यक्ष If you have any enquiry please click here Enquiry.
If you have a bank detail please click here