- सभासद झाला म्हणून त्याला विनातारण कर्ज देणे बंधनकारक नाही.
- वार्षिक सर्वसाधारण सभा व मा.उपनिबंधक यांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कर्ज वितरण केले जाईल.
- कर्ज रक्कमेच्या प्रमाणात २ किंवा ३ योग्य जामीनदार देणे आवश्यक आहे.त्यातील एक तरी जामीनदार शासकीय किंवा निम शासकीय कर्मचारी असावा.
- कर्ज शिल्लक रक्कमेवर व्याज आकारले जाईल.
- कर्ज रक्कमेच्या २०% रक्कम पतसंस्थेत ठेवणे आवश्यक आहे.
- कर्जदार व जामीनदार यांनी स्वतःचे फोटो,वास्तव्याचे उत्पनाचे पुरावे देणे बंधनकारक आहे.
- कर्ज प्रोसेसिंग फी,तारण ठेवलेल्या जागेचे कायदेशीर कागदपत्रे बनवणे व जागेचे नोंदणी करणे, शासकीय मान्यताप्राप्त मुल्यांकनाकडून मूल्य ठरवणे,संचालकांचा पाहणी अहवाल या सर्वांचा खर्च कर्जदाराला दयावा लागेल.
- संस्थ्या आपल्या सर्व कर्जदारांकरिता भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (कर्ज विमा योजना) माध्यमातून कर्ज विमा संरक्षण उपलब्ध करून देत आहे.
- थकबाकीदार व त्यांचे जामीनदार यांनी प्राथमिक नोटीस मिळताच संस्थेशी संपर्क साधून सहकार्य करावे व न्यायालयीन कारवाईतून होणारी असुविधा टाळावी.
- सभासदांना online कर्ज हप्ता भरायचा असल्यास त्यांनी या वेबसाईटच्या ‘संपर्क साधा’ येथे क्लिक केल्यास संस्थेच्या सर्व बँक खात्यांची तपशील मिळतील याची नोंद घ्यावी.
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.