बसलेले :- (डावीकडून उजवीकडे) सर्व श्री.शंकर हरी आडिवरेकर,सदाशिव नारायण रसाळ,रघुनाथ गोविंद राणे (धालवलकर) ,नामदेव विठ्ठल कांदळगावकर,मुकुंद सखाराम कामतेकर,दत्ताराम रामचंद्र राणे.
उभे:- (डावीकडून उजवीकडे ) सर्व श्री.अर्जुन भागोजी मटकर,यशवंत शंकर पावसकर,वसंत सिताराम कुरलकर,शेबा अनंत शेलार,शांताराम गोविंद किंजवडेकर,धोंडू अर्जुन तळावडेकर
उभे:- (डावीकडून उजवीकडे ) सर्व श्री.अर्जुन भागोजी मटकर,यशवंत शंकर पावसकर,वसंत सिताराम कुरलकर,शेबा अनंत शेलार,शांताराम गोविंद किंजवडेकर,धोंडू अर्जुन तळावडेकर
श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीचा इतिहास
सहकार चळवळीच्या स्तुत्य कार्यामधून प्रेरणा घेऊन,कार्यकर्त्यांमध्ये नवीन दृष्टी, नि:स्वार्थ उत्स्फूर्तपणे कार्यकत्यांच्या मनात समाज बांधवांची आर्थिक गरज दूर करण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळण्यासाठी तेली सेवा समाज संस्थेच्या कार्यालयात १ जानेवारी १९६६ रोजी एकत्र येऊन श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबईची मुहूर्तमेढ रोवली. २६ जानेवारी १९६६ रोजी १५५ भागधारकांचे ३०५२/- रुपये जमा करून संस्था नोंदणीसाठी अर्ज केला.समाजातील मान्यवर कार्यकर्ते नाना सखाराम कुणकेश्वर (चव्हाण) यांचे अध्यक्षते खाली रामनवमीच्या शुभदिवशी दिनांक ३१ मार्च १९६६ रोजी महाराष्ट्र हायस्कूल,ना.म.जोशी मार्ग,मुंबई ४०००१३.येथे सह-निबंधकांच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेत अध्यक्ष सर्व श्री.नामदेव कांदळगावकर,मुकुंद सखाराम कामतेकर (उपाध्यक्ष), दत्ताराम रामचंद्र राणे(सह चिटणीस) व वसंत सीताराम कुरळकर(सह चिटणीस), सदस्य- यशवंत हरी आडिवरेकर, धोंडू अर्जुन तळावडेकर,अर्जुन भागोजी मटकर,यशवंत शंकर पावसकर,शांताराम गोविंद किंजवडेकर, रघुनाथ गोविंद राणे, यशवंत हरी आडिवरेकर यांची एप्रिल १९६६ पासून अधिनियमानुसार पद्धतशीर संचालक म्हणून निवड झाली.
तेव्हापासून आजपर्यंत गेली ५२ वर्षे संस्थेचे कामकाज तेली सेवा समाज मुंबईच्या माध्यमातून सुरु आहे. त्याकाळी संस्थेच्या महत्वपूर्ण वाटचालीत सौ.जयश्री नामदेव कांदळगावकर सर्व श्री अनंत बापू दाभोळकर, आत्माराम शंकर डिचोलकर, गंगाराम घारू रसाळ,पांडुरंग महादेव रहाटे, मधुकर गणपत तळावडेकर, केशव गोविंद होळकर, महादेव विष्णू कोंडुरकर, वसंत नाना कुणकेश्वर (चव्हाण), सदाशिव सीताराम कुरळकर, दत्ताराम वाडेकर आदि मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेऊन संस्थेची सुरुवातीची जोपासना केली निकोप वाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सन १९७८—७९ दरम्यान पतपेढीचे कार्यालय खोली नं.३६,खिमजी नागजी चाळ नं.६,सेनापती बापट मार्ग,लोअर परेल,मुंबई ४०००१३ येथून तेली सेवा समाज,मुंबई व्दारा/ श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई शंकरराव नराम पथ, लोअर परेल, मुंबई ४०००१३ येथे स्थलांतरित झाले. तेव्हापासून संस्थेच्या उत्तरोत्तर विकास होत गेला.संस्थेची पहिली शाखा जोगेश्वरी येथे श्री.चंद्रकांत नारायण साटविलकर यांच्या अध्यक्षतेच्या कारकिर्दीत सुरु झाली.दिनांक १० जानेवारी २०१६ रोजी मालाड शाखा व दिनांक १ जुन २०१६ भांडूप शाखा श्री.दिलीप दशरथ केळंबेकर अध्यक्षतेच्या कारकिर्दीत सुरु झाल्या आहेत. त्यांचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरु आहे. सध्याचे पतपेढीचे स्वरूप पाहता सर्वांनी हवी हवी अशी वाटणारी आमची पतपेढी झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.