शिक्षण उत्तेजन निधी :
श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबईचे सभासद व त्यांची मुले यांच्यामध्ये विदयार्जनाची आवड निर्माण करणे तसेच विविध शैक्षणिक परीक्षा व कला क्रीडा स्पर्धा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे व आर्थिक मदत करणे या हेतूने श्री विश्वेश्वर शिक्षण निधीहा पतपेढीच्यासभासदांना दिला जातो. सदर योजनेतून इयत्ता चौथी ते सातवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण,शालांत परीक्षा(दहावी),उच्च माध्यमिक(बारावी)शासकीय विद्यापीठ परीक्षेत उत्तीर्ण (पदवी व पदविका), तसेच कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या (जिल्हा/राज्य/राष्ट्रीय/जागतिक स्तर) सभासदांस किंवा त्यांच्या पाल्यास लाभ घेता येईल.
सभासदांस सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लेखी अर्ज करणे सोबत प्रमाणित गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र यांची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
योजने अंतर्गत मिळणारी सत्कार बक्षिसे :
- शिष्यवृत्ती परीक्षा-इयत्ता चौथी आणि सातवी-रु.४००/-
- शालांत परिक्षा (दहावी)-रु.५००/-
- उच्च माध्यमिक (बारावी)-रु.६००/-
- शासकीय विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण (पदवी व पदविका)-रु.१०००/-
- कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य-रु.७००/-
सभासदांसाठी आर्थिक मदत :
सभासद मृत्यू पावल्यास त्याच्या वारसास सदिच्छेपोटी आर्थिक साहाय्य देणे किंवा सभासदाला गंभीर आजार व अपघातात गंभीर शत्रक्रिया यासाठी आर्थिक मदत करणे या हेतूने श्री विश्वेश्वर सभासद कल्याण निधी हा दिला जातो.वैदकिय मदत मागणीसाठी सभासदाने साठ दिवसांच्या आत वैदकीय दाखल्यासह अर्ज करणे आवश्यक आहे.वारसाला द्यावयाच्या रक्कमेतून मृत सभासदाकडून सर्व येणे असलेली रक्कम वसूल करण्याचे अधिकार पतपेढीला राहतील.
योजने अंतर्गत लाभ :
- सभासद संस्थेचा सभासद असताना सभासदाचा नैसर्गिक,आकस्मित मृत्यू आल्यास,त्याला तातडीची मदत रु.३०००/- देण्यात येईल. सभासदाच्या निधनापासून तीन महिन्याच्या आत सभासदाच्या वारसांनी संस्थेकडे मदतीसाठी मागणी करावी.(मृत्यूचा दाखला जोडणे आवश्यक आहे.)
- सभासदाला गंभीर आजार व अपघातात गंभीर शत्रक्रिया यासाठी आर्थिक मदत म्हणून रु.५०००/-देण्यात येईल.
शिक्षण उत्तेजन निधी व सभासदांसाठी आर्थिक मदत या योजने खाली मदत घेण्याकरिता काही नियम:
- सभासदत्त्वास १ वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असावा.
- या योजनेपोटी प्रत्येक सभासदाने पतपेढीचे भाग धारण रु.३०००/- किंवा रु.५०००/- करणे आवश्यक आहे.
- सभासद थकबाकीदार असता कामा नये.
- एका वेळी सभासदांच्या एकाच पाल्यास या योजने अंतर्गत लाभ घेता घेईल.
कर्मचारी कल्याण निधी :
- श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबईचे कायम कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी,आई/वडील आणि २ मुले) यांच्यावर आकस्मित अपघात,नैसर्गिक किंवा आकस्मित आपत्ती आल्यास सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मदत केली जाते.
- कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना गंभीर आजार झाल्यास व अपघातात गंभीर शत्रक्रिया करावी लागल्यास किंवा इतर गंभीर आजार झाल्यास आर्थिक मदत करते.
लोकोपयोगी निधी :
- या योजनेचा विनियोग देशावरील आकस्मित येणाऱ्या संकटाच्यावेळी(दुष्काळ,भूकंप,महापूर,युद्ध किंवा साथीचे आजार)केंद्र सरकार/राज्य सरकार/महानगर पालिका किंवा सामाजिक संस्थाना मदत करणे.
- कार्य क्षेत्रातील सामजिक व शैक्षणिक स्वयंसेवी संस्थाना मदत करणे.
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.